Ad will apear here
Next
आई!

तिन्हीसांजेची वेळ. अंधार पडायला सुरुवात झालेली... एका घनदाट जंगलातून मोलमजुरी करून घराचा गाडा हाकणारी एक स्त्री आपल्या तान्ह्याला कडेवर घेऊन झपझप पावलं टाकत पायवाट कापत असते. काळोख मिट्ट व्हायच्या आत जंगल पार करून घर गाठायचं असतं... अचानक वारे वाहू लागतात. आभाळ भरून येतं, झाडं आडवीतिडवी होत एकमेकांना झोडपू लागतात... पायवाटेवरचा पावलापुरता प्रकाशही अंधुक होतो आणि ही स्त्री घाबरते... ती भीती वादळाची नसते. अधाराचीही नसते. ती भीती, कडेवरच्या बाळाच्या सुरक्षिततेची असते...


वादळ आणखीनच जोर धरतं. झाडं बुंध्यापासूनच पिंगा घालू लागतात आणि पायवाटेवरून बाळाला छातीशी धरून एकएक पाऊल पुढे सरकणाऱ्या तिला वारापाऊस झोडपू लागतो. मधूनच झाडाची एखादी फांदी वाटेवर, डोक्याचा नेम धरून कोसळताना दिसते, आणि ही स्त्री सावध होते. बाळाला छातीशी घट्ट धरते, आणि वादळवारा, पावसाचा मारा, फांद्यांचे फटके स्वत:च्या पाठीवर झेलत दमानं पुढे जात रहाते.


अचानक सुरू झालेलं वादळ काही वेळाने शांत होतं. पाऊसही मंदावतो... तोवर जंगल संपून गावाची वेस सुरू झालेली असते. ती स्त्री पदरात घट्ट लपेटलेल्या बाळाकडे पाहाते. ते शांत, आश्वस्तपणे झोपलेलं असतं. मग ती आई समाधानानं हसते. काही वेळापूर्वी भयाण संकटाशी सामना करताना आलेला शीणही विसरते, आणि बाळाला आणखीनच घट्ट, उराशी कवटाळते. कारण ती आई असते...

*****

‘शेतकऱ्याचा प्रश्न हा असाच प्रश्न आहे. ते आपलं बाळ आहे असं समजून, आईच्या मायेनं त्याला संकटातून जपत बाहेर काढलं पाहिजे. त्यात राजकारण झालं, तर अगोदरच समस्यांचे तडाखे सोसणारा शेतकरी अधिक घायाळ होईल...’


शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलताना एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने मला ही गोष्ट सांगत प्रश्न समजावायचा प्रयत्न केला..... माझ्या मनातलं प्रश्नचिन्ह बहुधा त्याने वाचलं असावं.


‘माझ्याकडे पद आहे हो... पण ते शेळीच्या शेपटागत! काही वेळा, येडं राहण्यातच शानपना आसतोय!...’ तो म्हणाला.


त्याच्या सुरातला खेद मला स्पष्ट जाणवत होता!!
- दिनेश गुणे

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZOZCL
Similar Posts
मुडी...! बियाण्यासाठीचं धान्य साठवण्याच्या घरगुती मुड्या आज कुठे औषधालाही दिसत नाहीत. आता धान्य साठवण करून ठेवण्याइतपत शेतीही कुणी करत नाही; मात्र बालपणी पाहिलेल्या वस्तू कालौघातही पटकन विसरता येत नाहीत. ‘मुडी’विषयी बाबू घाडीगावकर यांनी केलेलं हे स्मरणरंजन...
कृषी विधेयकांची तोंडओळख; सामान्य नागरिक शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो? (व्हिडिओ) सध्या कृषी विधेयकांवरून उत्तरेकडील राज्यांत मोठे आंदोलन सुरू आहे. तसेच देशभर त्या कायद्यांविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. 'सोशल आइज' या संस्थेमार्फत प्राची शेवगावकर या तरुणीने सोबतच्या व्हिडिओतून या विधेयकांची थोडक्यात तोंडओळख करून दिली आहे. तसेच, तुमच्या-आमच्यासारखा सामान्य नागरिक शेतकऱ्यांना कसे बळ देऊ शकतो, हेही सांगितले आहे
‘योजक’ शेतकरी हा बियाणं पेरण्यापासून, त्याचं रुजणं, त्याचं वाढणं, त्याचं डोलणं, असं करत करत ते पीक हाती येईपर्यंतचा सगळा प्रवास स्वतः एन्जॉय करत असतो. तो फार संवेदनशील असतो. त्यामुळे नांगरणी यंत्रांकडून हाताला जाणवणाऱ्या कंपनापेक्षा बैलाच्या पाठीवर हात मारल्यानंतरचं बैलाचं शहारणारं अंग त्याला जास्त सुखावणारं असतं
‘तांबट’ पक्ष्याचा फराळ! घराच्या आवारातल्या उंबराच्या झाडावर फळांचा आस्वाद घेणाऱ्या तांबट पक्ष्याच्या जोडीचे अचानक दर्शन झाल्यावर आलेल्या सुखद पर्यावरणीय अनुभूतीचे धीरज वाटेकर यांनी केलेले हे वर्णन...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language